Ad will apear here
Next
विवेकानंद महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन
कोल्हापूर : भारतीय संसदेची लोकसभा व राज्यसभा अशी दोन सभागृहे असून, भारतीय संसद ही एक सार्वभौम सत्ता आहे, असे म्हटले जाते. संसद श्रेष्ठ की न्यायमंडळ अशा दुहेरी विचारसरणीमुळे मात्र, कधीकधी भारतीय समाजापुढे कोडे पडते. यावर विचारमंथन करण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाने ‘संसद श्रेष्ठ की न्यायमंडळ’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते.

या परिसंवादात विद्यार्थ्यांनी संसदेची कार्यक्षमता व लोकशाहीची पायाभूत विचारसरणी याविषयी विचारमंथन केले आणि कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यावर मूलभूत विचार मांडले. संसद, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे शासन संस्थेचे तिनही घटक भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांनुसार कार्य करत असतात. घटनेमध्ये कोणताही एक घटक श्रेष्ठ असल्याचा उल्लेख कुठेही नाही, असा निष्कर्ष या विचारमंथनातून मांडण्यात आला. 

परिसंवादात कलाशाखेच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी. ए. पवार यांनी या परिसंवादाचे आयोजन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीक्षा फराकटे यांनी केले, तर आभार अक्षय पाटील याने मानले. प्रा. एस. डी. जोशी, प्रा. एस. एम. रुईकर व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZYVBG
Similar Posts
विवेकानंद महाविद्यालयात स्वागत समारंभ विवेकानंद महाविद्यालयात एक ऑगस्ट रोजी एमएस्सीच्या (ऑरगॅनिक केमिस्ट्री) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. कार्यक्रमाला न्यू कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. पी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
हिंदी प्राध्यापक परिषदेचे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्र कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमधील हिंदी विभाग व शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ९ सप्टेंबर रोजी परिषदेचे तिसरे वार्षिक अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचा विषय ‘२१वी सदी के हिंदी साहित्य में नव विमर्श : विविध आयाम’ हा आहे. 
‘विवेकानंद’चे पाच विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण कोल्हापूर : विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे सेट/नेट मार्गदर्शन केंद्राचे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाचे विद्यार्थी अभिजीत संभाजीराव कदम, मनिषा पोवार, अरुण पुकले, सरदार निवृत्ती पाटील व सुधीर रामचंद्र माळी हे पाच विद्यार्थी एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language